Thursday, 29 August 2019

मनोरंजन माध्यमातून समाजात उन्नती घडवणारे उद्योजक ‘अजय हरिनाथ सिंह’!



जेव्हा सिंग्स अँड सन्स चा विषय येतो तेव्हा उद्योजकता आणि समाजकार्य एकत्रितपणे वाढताना दिसून येते. आता ह्यात अजून हि एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. त्यांचा युवा प्रतिभावान वंशज अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन अँड यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 


"नेटफ्लिक्स यूएसए चे राजीव, झी५ च्या रेश्मी आणि झी एंटरटेनमेंटचे जय यांच्याशी दीर्घकाळापासून व्यावसाहिक संबंध आणि अजून हा व्यावसायिक कारभार चीन, कोरिया, जपान, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया या देशांमध्ये त्याबरोबर पसरवण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल वितरण प्लॅटफॉमचा विस्तार करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत." अजय हरिनाथ सिंग म्हणाले.

भारतातील सर्वात शक्तिशाली, श्रीमंत आणि प्रभावी कुटुंबाचा भाग असल्यासोबत अजय हरिनाथ सिंह  विविध कंपन्यांसाठी काम करून अधिकाधिक अनुभव मिळवले. भारतीय उद्योजकतेची विलक्षण आवड असल्यामुळे त्यांनी डार्विन प्लॅटफॉर्म ऑफ कंपनी (डीपीजीसी) ची स्थापना केली. प्रामुख्याने तेल आणि शस्त्रे आणि दारूगोळा यावर लक्ष केंद्रित केले. पाहता-पाहता बँकिंग, फार्मास्युटिकल्स, वित्त, खाण, माहिती तंत्रज्ञान, विमान सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कंपन्यांमध्ये हिचे नाव प्रचलित झाले. सध्या ते कंपनीमध्ये ९६ टक्के वाटा शेअर करत डार्विन कंपनीच्या चेरमेन पदी कार्यरत आहेत.

अजय हरिनाथ सिंह हे रशियन आंतरराष्ट्रीय फॅमिली फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी सदस्य असताना मनोरंजन क्षेत्रात प्रचलित डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज (डीपीजीसी) चेअरमॅन आणि मॅनॅजिंग डायरेक्टर देखील आहेत. इतकेच नाही तर त्यांनी न्यूज मीडिया मध्ये देखील निवेश केला आहे. भारताच्या ५ मोठ्या प्रोडकशन हाऊस मधून २ प्रोडक्शन हाऊस चा ते आर्थिक कणा आहेत. यात ४३ चित्रपटांचा समावेश आहे ज्यात तीन भारतातील महागड्या बजेटच्या फिल्म्स असणार आहेत. अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन आणि यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता ते डीपीजीसी ( DPGC Group) ग्रुपचे सीओओ फरहाद विजय अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मिडीया हाऊसबरोबर सिनेमा, टीव्ही आणि वेबसाठी मुख्य प्रवाहात असलेल्या व्यावसायिक सामग्री निर्मितीकडे  प्रवास करीत आहेत. फरहाद अरोरा यांची अजून एक ओळख म्हणजे ते ज्येष्ठ अभिनेता विजय अरोरा आणि माजी मिस इंडिया दिलबेर देबरा यांचे सुपुत्र आहेत.

ह्या प्रोडक्शन हाऊसचा इतिहासातील सगळ्यात मोठ्या सम्राट चंगेज खान यांच्या जीवनावर आधारित ३ भागाचा बायोपिक गाथा हा एक मेगा बजेट निर्मिती असेल ज्याचे शीर्षक आहे 'द राईज ऑफ मंगोल' हा पोस्ट प्रोडक्शन टप्प्यात आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू आणि इतर ही भाषांमध्ये प्रदर्शित होईल. तसेच ते 'तेरा क्या होगा लंबोदर', 'अझिजान' आणि 'व्हॅलेट पार्किंग' सारख्या समांतर  चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. २०२० वर्षी दिवाळीला  कंगना राणावत स्टारर 'धाकड' आणि ह्या सोबत 'रिक्षा', 'लेडी लक', आणि 'एन्ड युवर एक्स' हे तीन चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यात आहेत. डॉ. फरहाद विजय अरोरा म्हणाले, "अचूक करमणूक हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि सर्वांना आनंद देण्याचे मुख्य स्त्रोत आहे, जे जनतेच्या कल्याणासाठी आणि संपूर्णपणे देश आणि मानवतेच्या प्रगतीत योगदान देतेय."

"आमची सामाजिक आर्थिक दृष्टी, भारतीय करमणूक उद्योगांना समग्र वाढ प्रदान करणे आणि संघटित आणि सुरक्षित समुदायामध्ये विस्तार करणे तसेच रोजगारासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे. लोकांचे मनोरंजन करून आनंद पसरवणे. ह्यातून भारताच्या जीडीपी उद्योगात सकारात्मक वाढ करणे आहे." असे डीपीजीसी ग्रुप चे सीएफओ हरेश महापात्रा म्हणाले.

डार्विन प्लॅटफॉर्म समूह हा १९ पब्लिक लिस्टेड कंपन्यांचे साम्राज्य असलेले सुरुवातीपासून ते आतापर्यंतची एक कर्जमुक्त संस्था आहे आणि  तीची मालमत्ता उलाढाल ४१,००० करोड आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि रशियन चित्रपटांमध्ये त्यांच्या उपस्थितीसह डार्विन प्लॅटफॉर्म मास मीडियाची २८९ करोडपेक्षा जास्तची उलाढाल आहे. वाजवी दराने मनोरंजन उद्योगासाठी वित्तपुरवठा करणार्‍या कंपनीला चांगली सामग्री तयार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.

"श्री रोहित जैन आणि श्री. गौरव जैन यांच्या अध्यक्षतेखालील एक मजबूत कायदेशीर संघ म्हणून डीपीजीसी सर्व क्षेत्रातील दृष्टांत बदलण्यास योगदान देईल.  सल्लागार म्हणून कंपनीचे भारताचे दोन मानद निवृत्त मुख्य न्यायाधीश आणि सल्लागार पदावर उच्च न्यायालयाचे तीन सेवानिवृत्त न्यायमूर्ती देखील आहेत." डीपीजीसी ग्रुप चे सीइओ श्री. राहुल गणपुले म्हणाले. डार्विन प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सेक्टरची काळजी श्री मोहम्मद अन्वर बावला घेत आहेत. श्री. दीपक जांगरा, श्री शिव चरण आणि श्री राकेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात विविध आयटी अँड सेल्स टीमचा कार्यभार सांभाळत आहेत.

अलिकडच्या काही वर्षांत, सिंह यांनी अनेक लोकोपयोगी प्रयत्नांसाठी आपला वेळ दिला असून त्यांच्या ह्या सेवाभावी उपक्रमांचा विस्तार साता समुद्रापार देखील केला गेला आहे.  बेघर आणि गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी त्यांच्या जन्मभूमीत अजय हरिनाथ सिंह फौंडेशन (AHSF) फूड चॅरिटी संस्थेची स्थापन केली गेली होती आणि आता लंडन (यूके) आणि फिलाडेल्फिया (यूएस) मध्ये ३००० हून अधिक गरजूंना शाकाहारी जेवण उपलब्ध करुन देणारे स्वयंपाकघर उघडले आहे. तसेच डार्विन ग्रुप ऑफ कंपनीच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ च्या माध्यमातून त्यांनी आखलेल्या योजने अंतर्गत लातूर (महाराष्ट्र) आणि भुज (गुजरात) मध्ये कमी खर्चिक रुग्णालये यशस्वीरित्या बांधण्यात आली आहेत. "ह्या यशाचे बरेच आशीर्वाद मिल्यानंतर माझा आनंद हा केवळ समाजाच्या उन्नतीसाठी आणि आनंदाचे माध्यम बनले आहे." असे ते म्हणाले. या रुग्णालयांनी अडीचशे कोटींहून अधिक खर्चासह या भागातील अल्प-उत्पन्न कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे.

इंटरटेंनमेंट क्षेत्रात यशाची धाव घेण्याखेरीज, सध्या प्रतिभावान अजय हरिनाथ सिंह १९३० च्या दशकापासून चालणार सिंग्स अँड सन्सचा वारसा त्यांच्या क्षेत्रीय बँकिंग व्यवसायापासून बरयाच तऱ्हेने पुढे आणला आहे. सध्या ते खाण आणि तेल, शिपिंग लॉजिस्टिक्स आणि एअरलाइन्स, शेती, उर्जा, मास मीडिया, फार्मास्युटिकल्स, आयटी, शिक्षण, बँकिंग आणि एकात्मिक वित्तपुरवठा यांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.

अश्या या अजय हरिनाथ सिंह यांना प्रगतीपथावर उत्तोरोत्तर यश मिळो.

No comments:

Post a Comment