Thursday, 9 April 2020

अभिनेता - उद्योजक सचिन जोशी ने बीएमसी ला क्वारंटाईनसाठी हॉटेल 'द बिटल' चा प्रस्ताव दिला



स्वयं-वेगळे आणि स्व:ताला क्वारंटाईन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे कारण विषारी कोरोनाव्हायरस (कोविड -१९) भारतातील हजारो लोकांना आणि परदेशात लाखोंना प्रभावित करत आहे. २१ दिवसांच्या लॉकडाउनमधून भारत जात असताना, नागरिकांनी हे सिद्ध केले आहे की माणुसकी  अजूनही अस्तित्त्वात आहे! टाटांप्रमाणेच, वायकिंग ग्रुपचे सीएमडी आणि प्रशंसित अभिनेते-उद्योजक सचिन जे. जोशीसुद्धा यासाठी पुढे आले आहेत आणि हातभार लावत आहेत.

बिग ब्रदर फाउंडेशनमागील प्रेरक शक्ती असणारे सचिन जे. जोशी यांना परदेशातून येणा ऱ्या प्रवासी जे कोविड -१९ संक्रमित असतील त्यांना क्वारंटाईन म्हणून येथे ठेवण्यात यावे असा प्रस्ताव दिला गेला आहे. पवईतल्या बीटेल हॉटेल ३६ खोल्यांचे बुटिक हॉटेल आहे.

दुबईत अडकलेल्या सचिन जे. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “मुंबई हे एक दाट लोकवस्तीचे शहर आहे, म्हणून आपले शहर वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुरेशी रुग्णालये आणि बेड नाहीत. जेव्हा महापालिकेने मदतीसाठी आमच्याकडे संपर्क साधला तेव्हा आम्ही स्व इच्छेने मदत करण्यास सहमती दर्शविली. ”  अभिनेता-उद्योजक सचिन जे जोशी यांनी अझान या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी सनी लिओन बरोबर जॅकपॉट, लिसा रे आणि उषा जाधव यांच्यासह  वीरप्पन यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नर्गिस फखरी आणि मोना सिंग यांच्यासमवेत अमावस या चित्रपटमध्ये शेवटी दिसलेले. ते म्हणाले, “आम्ही बीएमसीच्या मदतीसाठी आमच्या हॉटेलला प्रवाश्यांसाठी क्वारंटाईन  ठेवण्याच्या सुविधेसाठी रुपांतर केले आहे.”

नियमित तपासणीसाठी नेमलेल्या विशेष डॉक्टर आणि परिचारिकांसह क्वारंटाईन केलेल्यांसाठी महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत तसेच काही मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. "आवश्यक साधनसामुग्रीसह आणि सुसज्ज स्टाफसह संपूर्ण इमारत, खोल्या नियमितपणे स्वच्छ केल्या जातात."

सचिन असे मानतात फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर व्हायरसशी लढायला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त भारतच नाही. हा धोकादायक कोरोनाव्हायरस जगाविरूद्ध उभा आहे. सरकारी कामगार आणि गरीब लोकांना लक्षात ठेवून त्यांची बिग ब्रदर फाउंडेशन गरजू लोकांना अन्नाचे डब्बे  वितरण करीत आहे. क्वारंटाईन काळाच्या समाप्तीपर्यंत फाउंडेशन हे कार्य करत राहील!

“
मला आनंद आहे की आमचे पवई मधील हॉटेल ‘द बीटल’ विषाणूपासून प्रभावित क्वारंटाईनसाठी बीएमसीला देण्यात आले आहे. हा माझ्या पतीच्या निर्णय आहे आणि मी त्याचा आदर आणि समर्थन करते, ”अशी प्रतिक्रिया नकाब प्रसिद्धीप्राप्त अभिनेत्री आणि सचिन जे जोशी यांची पत्नी उर्वशी शर्मा यांनी दिली. “आम्ही आमच्या हॉटेलमधून सर्व अधिकारी आणि रस्त्यावर अडकलेल्या लोकांना अन्न वितरण करीत आहोत. आमची टीम आता जवळजवळ दोन आठवड्यांपासून नि: स्वार्थपणे हे काम करत आहे आणि आम्ही जोपर्यंत सक्षम आहोत तोपर्यंत आमचा पाठिंबा देत राहू. "  


लॉकडाउन दरम्यान आर्थिक अडचणीत असलेल्या सदस्यांसाठी सिंटा (CINTAA) चा देणग्यां गोळा करण्याचा प्रयत्न



२१ दिवसांच्या लॉकडाउनमधून भारत जातोय आणि यामुळे  चित्रपट आणि टीव्ही कलाकारांचे उदरनिर्वाह गमावले आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्टेट्स असोसिएशन या इंडियन ट्रेड युनियन अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत एक स्वयंशासित संस्था असून त्यांनी जनतेला व त्यातील ए-लिस्टर सदस्यांना राशन व मदत निधी देण्यास आवाहन केले आहे.

“
सिंटामध्ये खूप मर्यादित कोष असल्याने,आम्ही पैश्याने समृद्ध संस्था नाही. ह्याचाच एक विभाग आमची चॅरिटेबल उप ट्रस्ट, सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्टचा  (सीएडब्ल्यूटी) देखील निधी संपत आहे. ” असे सीएनटीएए च्या वरिष्ठ सह-सचिव आणि आउटरीच कमिटीचे सभापती -अभिनेते अमित बहल यांनी सांगितले. “आम्ही आमच्या सर्व सदस्यांना आणि ए-लिस्टर्सना आम्हाला रेशन व काही निधी दान मदत करण्यास सुरूवात करण्याचे आवाहन केले आहे.  आम्ही सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्टच्या खात्याचा क्रमांक आणि आयएफएससी प्रसारित केला आहे  त्यांना ८०G सर्टिफिकेटचाही लाभ मिळेल. ”

यापूर्वीच प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. आम्हाला कळले आहे की सिंटा (CINTAA) चे अनेक ज्येष्ठ व सुप्रसिद्ध अभिनेते त्यांचे अपील व्हिडिओ पाठवित आहेत. सदस्य, ए-लिस्टर्स आणि जनते व्यतिरिक्त, सिंटाने I & B मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारकडेही संपर्क साधला आहे आणि संकटकाळात प्रसारकांना पैसे देण्याची विनंती केली आहे. "साधारणपणे, ९० -१२० दिवसाचे चक्र असते जेथे पेमेंट्स क्लिअर केले जातात," बहेल म्हणाले.

सिंटा (CINTAA) च्या स्वतःच्या कोषामधून असोसिएशनने त्यांच्या गरजू सदस्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ते रेशन पॅकेट बनवित आहेत आणि त्यांचे वितरण करीत आहेत. तसेच. प्रत्यक्ष गरजांनुसार २००० / - प्रति सभासद भरपाई देखील दिली जात आहे. “सुरुवात झाली आहे. आम्ही आमच्या सदस्यांना मदत करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करीत आहोत, ”बहाल यांनी पुष्टी केली.

Sunday, 5 April 2020

दुबईमध्ये अडकलेल्या सचिन जे.जोशी यांची भारतातील गरजूंना मदत



 बिग ब्रदर फाउंडेशनच्या माध्यातून ३ कोटी रुपयांचे खाद्यपदार्थांचे करणार वाटप

२१ दिवसांच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अभिनेता-उद्योजक सचिन जे. जोशी यांनी मानवतेच्या सेवेसाठी कार्य करत असलेल्या सरकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले. बिग ब्रदर फाउंडेशनबरोबर त्यांचा आवडता प्रकल्प म्हणून, सचिनने सक्रिय पोलिस कर्मचारी आणि म्युनिसिपल कामगारांना उबदार पौष्टिक जेवण देण्याचा निर्णय घेतला.


“शहरात सतत नजर ठेवणारे पोलिस, रुग्णालयांमधील डॉक्टर,नर्सेस व पॅरामेडिक्स, म्युनिसिपल कर्मचारी वेळेवर जीवनावश्यक वस्तू आणि २४  तास पाणीपुरवठा करणे सुनिश्चित करतात. तसेच ट्रॅफिक पोलिस  इतर सैन्याने दलासह  बंदोबस्ताचे कठोरपणे पालन केले जात आहे हे सुनिश्चित करत आहेत., ”सचिन जे. जोशी म्हणाले.

बिग ब्रदर टीमच्या सदस्याने स्पष्ट केले की, “जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिस त्यांना त्याच दिवशी एका तासाच्या आधी आणि आवश्यकतेनुसार अन्नाची आवश्यकता असलेल्या क्षेत्राची माहिती देतात आणि आम्ही आवश्यकता पूर्ण करतो,” बिग ब्रदर टीमच्या सदस्याने स्पष्ट केले.

भारतात लॉकडाऊन झाल्यापासून दुबईमध्ये अडकलेल्या सचिन जे. जोशी यांनी तेथून संस्थेच्या कामकाजाचे समन्वय साधले. याबद्दल ते म्हणाले, "माझ्या भारतातील व्यवस्थापकांची टीम माझ्या सूचनांनुसार काम करत आहेत. माझ्या हॉटेलच्या शेफना या सर्व तयारीसाठी आवश्यक ती मदत आमच्या कारखान्याच्या कर्मचारी करत आहे. ते सर्व आवश्यक सुरक्षा उपकारांनासह सुसज्ज आहेत. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करीत आहोत, आम्ही सर्वोपरी प्रयत्न करीत आहोत, विशेषत: त्या लोकांसाठी जे ह्या दिवसात उपासमारीशी झुंज देत आहेत आणि  वाहतुकीचा कोणताही मार्ग नाही तरीही घराचा परतीचा  प्रवास करत आहे.  खेदजनक बाब म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि एनसीआर-दिल्लीची छोटी शहरे आणि खेड्यांना आवश्यक रेशन मिळणे अशक्य आहे. आम्ही त्यांनाही मदत करत आहोत. "

सचिन जे. जोशी यांची पत्नी उर्वशी शर्मा ज्या ह्यावर घरातून पर्यवेक्षण करीत आहेत, त्या म्हणाल्या, “मी भारतात आहे आणि या सर्व कार्यवाहीचे परीक्षण करण्यासाठी, मदत करण्यासाठी दररोज संपर्कात आहे. माझे पती आणि आमची संपूर्ण टीम आमचे सर्वोत्तम कार्य करण्यासाठी निःस्वार्थपणे प्रयत्न करीत आहोत! अशा प्रकारच्या परीक्षेच्या वेळी माणुसकी आणि संवेदनशील असणे महत्वाचे आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण एक उदाहरण मांडण्याची गरज आहे.

साल २०१२ मध्ये नफा योजनेसाठी नव्हे तर 'बिग ब्रदर' हि संस्था  सामाजिक दूरदृष्टी असलेल्या सचिन जोशी यांनी ग्रामीण भागातील वंचितांची व महिलांच्या सबलीकरणासाठी सुरु केली होती. आज बिग ब्रदर फाउंडेशनच्या टीमने एलबीएस, कांजूर मार्ग, पवई हिरानंदानी, भांडुप आणि  इतर ठिकाणी सामाजिक कार्य  केले. लॉकडाऊन संपेपर्यंत संपूर्ण कार्यासाठी लागणारा अंदाजित एकूण खर्च रू.३ कोटीचा आहे. ह्याबद्दल सचिन जे. जोशी म्हणाले, "आम्ही हे कार्य २१ दिवसांच्या लॉकडाऊच्या कालावधीत करण्याचा विचार करीत आहोत. लोक देणग्यांना प्राधान्य देताना, मी स्व: हातांनी मदत करू इच्छितो."अश्या ह्या बिग ब्रदर फाउंडेशन आणि सचिन जे. जोशी यांना अधिक शक्ती मिळो!