Tuesday 4 May 2021

सुपरहिट सलमान खान-हिमेश रेशमिया कॉम्बोसह राधे’तील ‘दिल देदिया’ गाण्याने पायल देव दुहेरी आनंदात.

संगीतकार हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केलेले पायल देवच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड केलेले, सलमान खान आणिजॅकलिन फर्नांडिस यांच्यावर चित्रित झालेले राधे सिनेमातीलदिल दे दियागाणे आज रिलीज करण्यात आले. पायलच्या अनोख्या आवाजातील हे गाणे नवा इतिहास रचण्यास सिद्धझाले आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतीलआघाडीच्या गायिकांपैकी एक गायिका म्हणून पायल देवला ओळखले जाते. पायलने  गायिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु नंतर तिचा प्रवास गायिका ते संगीतकार होण्यापर्यंत झाला आहे.पायलच्या आवाजाचा पोत अत्यंत वेगळा आणि उत्कृष्ट असल्याने कोणत्याही प्रकारची गाणी ती लिलया गाऊ शकते. तिच्या या प्रतिभेमुळेच सर्व संगीतकारांकडून तिला गाण्यासाठी बोलावले जाते."प्रत्येक गाणे संगीतकारांनी अत्यंत प्रेमाने तयार केलेले असते आणि ते अनोखे असते. आणि गायक त्या गाण्याला म्यूझिशियननी साज चढवलेला असतो. गायक त्याच्या आवाजाने गाण्याला त्याच्या आवाजाने रत्नजडित मुकुट प्रदान करेल अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येक गाण्याला मी माझा आवाज देऊन एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करते. हा एक वेगळा आणि अनोखा अनुभव असतो'' असे पायल देवने म्हटले.

'दिल दे दिया' गाण्याद्दल भावना व्यक्त करताना या गाण्याने तिला दुहेरी आनंद मिळाला असे म्हटलेसलमान खान आणि हिमेश रेशमिया यांच्या सुपरहिटकॉम्बिनेशनने तिच्या आवाजातील जुम्मा गाणे तयार केले असून ते शुक्रवारी रिलीज करण्यात आले.पायल म्हणते, "हिमेशभाईंना माझ्याआवाजाचा पोत चांगलाच ठाऊक आहे. संगीतकार म्हणून त्यांचा दृष्टिकोण स्पष्ट आहेगाण्यासाठी कायहवे आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तसेच गाणे काहीही अडचण येता गाता यावे यासाठी ते प्रयत्न करीत असता त्यामुळे त्यांच्यासाठी गाणे खूप सोपे आहे.जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांचे गाणे ऐकता तेव्हा त्या गाण्याची मधुरता तुम्हाला जाणवते. जुम्मे की रात या गाण्यात ही मधुरता तुम्हाला दिसून येईल. यापूर्वी मी जॅकलीनसाठी गेंदा फूल आणि रेस सिनेमातील गेंदा फूल ही गाणी गायली होती. आणि आता जॅकलीनसाठी तिसऱ्यांदा गाणे गात आहे तर सलमानसोबत माझे हे चौथे गाणे आहे
हिमेशभाईंचे विचारआणि त्यांच्या दृष्टीचे अनुसरण करते त्यामुळे मी उत्कृष्ट प्रकारे गाणे गाऊ शकते आणि हेच अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना माझा आवाज आणि आवाजाचा पोत खूप आवडतो आणि ते माझ्या आवाजाचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून वेगळे आणि वेगळ्या संगीतातील गाणे गाऊन घेतात. हे गाणे एक डान्स ट्रॅक असल्याने तते डब करताना याचा विचार करून तशा प्रकारे गाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे ठरते, एक गायक म्हणून, जेव्हा संगीतकाराच्या मेहनतीकडे पाहाता आणि त्याचा विचार, गाण्याची मधुरता पुढे घेऊन जाता तेव्हा ते गाणे लोकांच्या ओठावर खेळू लागते. "दिल दे दिया'च्या बाबतीतही असेच घडले आहे असेही पायलने विस्तृतपणे सांगितले.पायलने तिच्या पहिल्याच 'तुम ही आना' या गाण्याने संगीत क्षेत्रात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. या गाण्यानंतर तिच्यासाठी संगीतक्षेत्राचे दरवाजे मोठ्या प्रमाणावर उघडले गेले आणि त्यानंतर पायलने मागे वळून पाहिले नाही. तिने एकामागोमाग एक चित्रपट आणि डिजिटल मीडियासाठी सुपरहिट गाणी दिली.अत्यंत कमी वेळात पायलने तिच्या अनोख्या संगीतामुळे संगीतप्रेमींवर गारुड केले आणि संगीत क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे उंच स्थान निर्माण केले. पायलने मुंबईत विविध संगीतकारांबरोबर जाहिरातींसाठी जिंगल्स, कार्पोरेट साँग आणि डॉक्यूमेंट्रीसाठी आवाज देत करिअरला सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर सुपरहिट चित्रपट ग्रँड-मस्तीसाठी टायटल साँगही गायले होते. हे गाणे सुपरहिट झाले होते.पायलने गेंदा फूल, क्यों, दिल चाहते हो, बारिश, बेपनाह प्यार या स्वतंत्र सोलो गाण्यानंतर पायलने बाजीराव मस्तानी, रेस 3, दबंग 3, स्टुडंट ऑफ इयर 2या अशा काही सुपरहिट सिनेमासाठी गाणी गायली आहेत.गाणे असो वा संगीत देणे असो पायलने नेहमी नवे प्रयोग केले आणि वेगळ्या प्रकारची मधुर गाणी लोकांसमोर सादर केली. पायलने पॉपवेस्टर्न, जॅझ, गझल, हिप-हॉप, रॉक आणि यासारख्या विभिन्न शैलींमध्ये गाणी दिली आहेत. तिला नेहमी आवाजात नवीन प्रयोग आणि शैली शोधणेआवडतेपायल संगीताची खरी खरीभक्त असून प्रत्येक गाणे म्हणजे तिला लहान बाळासारखे वाटते. बाळाला ज्याप्रमाणे चांगले संगोपन करून पूर्णसंभाव्यतेने वाढवले जाते अगदी तशाच प्रकारे ती स्वतःच्या गाण्यांची काळजी घेते आणि लोकांसमोर सादर करते. त्यामुळे लोकांना तिची गाणी प्रचंड आवडतात आणि ते तिच्यावर प्रेमही करतात.'दिल दे दिया' हे गाणे पायल देवच्या मुकुटातील आणखी एक हीरा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि हा हिऱ्याला  सलमान खान-हिमेश रेशमिया जोडीने पैलू पाडलेले आहेत.

 

Song link : https://youtu.be/e1Bj4tMGh64

 

No comments:

Post a Comment